Tuesday, September 10, 2019

मूलभूत गरजा

अन्न,वस्त्र,निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत पण माणूस यावर समाधानी आहे का? या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती पैशाची!!! आणि हीच गरज सर्वात मोठी होऊन बसली आहे. खरच पैसे ही आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची गरज झाली आहे असेच प्रत्येकाला वाटू लागले. त्यासाठी नाती,प्रेम,आनंद आत्मिक समाधान मागे पडत चालले आहे. माणूस खरंच पैशाने सुखी होतो का??? माणसाला सुखी होण्यास गरज आहे समाधानाची प्रत्येक गोष्टीत समाधान असावे लागते.
सध्याच्या युगात भौतिक गरजा कितीही वाढल्या असल्या तरी क्षणिकच आहेत असे वाटते. मोबाईल, टीव्ही, वाहन, मनोरंजन साधने ही सर्व  मानवाच्या सुखसोयीसाठी बनवली गेली आहेत. गरज ही शोधाची जननी आहे. आयुष्य सुखकर होण्यासाठी मानवाने विविध उपकरणे, तंत्रज्ञान, यंत्रे, वाहने इत्यादीचा शोध लावला. परंतु याशिवाय माणूस जगूच शकणार नाही. शहरात किती सुविधा उपलब्ध आहेत तरी मानव समाधानी नाही. आजही कित्येक खेडोपाडी साधी वीजही नाही बाकीतर विचारच करू शकत नाही. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी त्यांना किती कष्ट करावे लागते .खरच त्यांना सुख-सुविधांची गरज आहे. अजूनही ते खूप गरीब आहेत त्यांना पाहिजे तशा सुविधा मिळाल्या नाहीत.

No comments:

Post a Comment