आई या शब्दातच किती अर्थ लपलाय आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आईबद्दल जितक लिहाव तितके कमीच आहे .आई ही जगातील अशी व्यक्ती आहे जिला काहीही न सांगता आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहचत असतात.आई नऊ महिने आपल्या बाळाचा पोटात सांभाळ करत असते.आणि हिच मुले मोठी झाल्यावर तिला आश्रमात टाकतात का तर त्यांंना आई नको नको वाटत असते.आईचा म्हतारपणी त्यांंना त्रास होत असतो.आई जरी शिकलेली नसली तरी ती आपल्या मुलांना नेहमी सत्याचा मार्ग दाखवत असते. आपण लहानाचे मोठे होईपर्यंत आईवर आपली खूप मोठी जबाबदारी असते. ती आपल्यासाठी खूप काही करत असते. आपल्या प्रत्येक सुखात दुःखात आपली साथ देत असते. मुले मोठी झाली की आईची किंमतच विसरून जातात. हया जगात व्यक्ती कितीही श्रीमंत असला तरी आईशिवाय खूप अपूर्ण आहे. आई नसती तर कदाचित आपण हया जगात नसतो.खरंच ज्याच्यांकडे आई आहे ते खूप नशीबवान आहेत.आपल्याकडे एखादी वस्तू असते तेव्हा आपल्याला त्या वस्तूची किंमत समजत नाही .जेव्हा एखादी व्यक्ती हया जगात नसते तेव्हा त्याची किंमत कळते.आईची जागा हया जगात कोणीच घेऊ शकत नाही. जर आई थोडया वेळासाठी कुठे गेली तरी घर किती शांंत वाटते तर तुम्ही विचार करा ज्यांच्याकडे आईच नाही त्यांंना जीवन जगणे किती अवघड होत असेल.खरंच जसा आईने लहानाचे मोठे होताना आपला सांभाळ केला तसा म्हतारपणी तिचा आधार बना.हया जगात सगळ्यांंनाच आईचे सुख मिळत नाही.
हर्षाली पटेल
No comments:
Post a Comment