Friday, March 20, 2020

राजस्थान संस्कृती

                     राजस्थान संस्कृती
                     प्रस्तावना
राजस्थान उत्तर भारतातील राज्य आहे. राजस्थान म्हणजे वाळंवटी प्रदेश.वाळवंटात हिरवाई तसेच धबधब्याने नटलेले असे निसर्गसंपन्न पर्यटन स्थळ आहे. भव्य राजवाडे ,कलात्मक हार,प्राचीन मंदिरे, निसर्ग मानव निर्मित सरोवरे ऐतिहासिक किल्ले असा राजस्थानच्या समृद्ध वारसा पर्यटनामध्ये झळाळून निघतो. राजस्थान मधील वातावरण आणि निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. पारंपरिक लोक संगीतापासून ते चविष्ट पाककलेपर्यंत अनेक बाबतीत बहुरंगी असलेले रंगीबिरंगी राजस्थान पहायला जगभरातील लाखो पर्यटन दरवर्षी येतात. भौगोलिक विविधता, ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य व विविधरंगी संस्कृती यामुळे राजस्थान मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करते. उष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे राजस्थानमध्ये शेतीचे प्रमाण कमी आहे. ज्वारी,मका,बाजरी,गहू ही राजस्थानमधील प्रमुख धान्य आहेत. ऊस, तेल, तंबाखू ही नगदी पिके आहेत. बनास ,लोनी, घग्गर, चंबर हया नद्या राजस्थानमधून वाहतात.
   प्राणी व पक्षी : राजस्थानात शुष्क हवामानाचे प्रमाण जास्त आहे .तसेच जंगलाचे कव्हरही अतिशय कमी आहे. राजस्थानमध्ये जैवविविधता जास्त आहे. कोरडे वाळवंट,शुष्क काटेरी जंगल अशा प्रकारची वने आढळतात. राजस्थान मध्ये शुष्क वातावरण असल्याने नैसर्गिक साधन संपत्ती कमी आहे येथे निसर्ग संवर्धनाला जास्त महत्त्व देतात.
   राजस्थानमध्ये  चिंकारा, काळवीट, रानगाढव, व भारतीय लांडगा हे वन्यजीव दिसून येतात. माळढोक हा राजस्थानचा राज्यपक्षी अतिशय दुर्मिळ आहे .गाढव हे  फक्त राजस्थानच्या वाळवंटी भागात व कच्छच्या रणात दिसून येते. वाळवंटी मांजर, वाळवंटी खोकड ,हे प्राणी राजस्थानमध्ये आढळतात. अरवलीच्या सानिध्यात अनेक अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने आहेत.राजस्थानमध्ये उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.

जयपूर,उदयपूर,जोधपूर ,जैसलमेर हे राजस्थान मधील ऐतिहासिक स्थळे आहेत.
                            जयपूर
  जयपूर हे शहर गुलाबी दगडांतील बांधकामामुळे प्रसिद्ध आहे.या  शहराला पिंंक सिटी म्हणताात. अंबर फोर्ट जयपूरच्या शासकांचे राहण्याचे ठिकाण आहे. टोलेजंग हवेल्याा, मोठे-मोठे दरबार, सुंदर बगीचे पाहायला मिळतात.
                           उदयपूर
उदयपुर राजस्थान मधील महालांचे महत्त्वाचे शहर आहे.  उदयपूरला मोस्ट रोमांटिक सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. प्रशस्त उद्याने,स्वच्छ पाण्याचे तलाव,जागोजागी उभारलेल्या सुंदर कमानी हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. म्युझियम राजवंशातील व्यक्तींचे फोटो व वस्तू यांनी सजलेले आहे. उदयपूरमधील महालांचे  रूपांतर हॉटेल्समध्ये करण्यात आले आहे.

                           जैसलमेर
जैसलमेर हे राजवाडे,हवेल्या,आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. जैसलमेर हे जगातील प्रसिद्ध वाळवंट त्यातील वाळूच्या टेकड्यांवर सुंदर दिसते.

                            जोधपूर
जोधपुर ब्लू सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. निळ्या रंगात रंगवलेली घरे,कोरीवकाम केलेले फर्निचर येथील वैशिष्ट्य आहे.जोधपूरच्या  आसमंतातील  किल्ले  हे व्यवस्थित  जतन  करून  ठेवले  आहेत. जोधपूरमधील मार्केट प्रवाशांचे आकर्षण आहे.

              भाषा-बोलीभाषा
राजस्थानमध्ये राजस्थानी ,मारवाडी, मेवाडी, मेवती इत्यादी भाषा बोलल्या जातात.

राजस्थानी - राजस्थानी ही भाषा राजस्थान, जोधपूर या भागात बोलली जाते.

मारवाडी - मारवाडी ही राजस्थान भाषेची बोली आहे. मारवाडी भाषा गुजरात, राजस्थान,मारवाड, मल्लानी, मेरवाढ, किशनगढ, सिरोही, पालनपुर, जैसलमेर, बिकानेर या भागात बोलली जाते.

मेवाडी -  मेवाडी भाषा दक्षिण राजस्थान, उदयपूर, भीलवाडा, चित्तोडगड इत्यादी भागात बोलली जाते.

मेवती - मेवती ही भाषा हरियाणा, राजस्थानमध्ये बोलली जाते.

                खाद्यसंस्कृती
राजस्थानमध्ये दाल -बाटी ,दाल बाफले, मिठाई, चटपटे गट्टे ,मावा ,मालपुआ,फरसाण इत्यादी खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. याशिवाय जेवाणात पनीरची भाजी, बाजरीची भाकरी, मुगाच्या डाळीचा साजूक तुपातला शिरा, पापड, कांजी वडे ,खस्ता बाटी,पंचमेली दाल,मखाना, पंजीरी, रसगुल्ला इत्यादी चविष्ट खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. चविष्ट चमचमीत खाद्यपदार्थ राजस्थानचे वैशिष्ट्ये आहे.राजस्थानमधील खाद्यपदार्थाचा पर्यटकांना आनंद घेता येतो.

                      वेशभूषा
राजस्थानी लोक रंगीबेरंगी कपड्यांच्या पेहरावासाठी प्रसिद्ध आहे.

महिलांची वेशभूषा -लेहंगा,  चनिया-चोली,घागरा, कुर्ती अशी राजस्थानी महिलांची वेशभूषा आहे.

पुरुषांची वेशभूषा - धोती ,कुर्ता,पॅन्ट, पायजमा अशी राजस्थानी पुरुषांची वेशभूषा आहे. राजस्थानी पुरुष डोक्याला फेटा बांधतात. त्याचे कपडे भडक रंगाचे असतात.

                        सण-उत्सव
                      उंट उत्सवराजस्थानमध्ये उंट उत्सव एक वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव  जाानेवारीमध्येे साजरा केला जातो. या उत्सवात  उंटाची स्पर्धा, उंटाची कला,उंटाचे सौंदर्य अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात.
                   मकरसंक्रांत
  मकरसंक्रांत  हा सण राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.विवध प्ररकारची रंगीत पतंग उडवले जातात. मकरसंक्रांतीच्या दिवशी पूर्ण राजस्थान एकत्र येऊन या सणाचा आनंद घेेेतात
                            होळी
होळी  हा सण राजस्थानमधील महत्त्वाचा सण आहे. फाल्गुन महिन्यात शुक्ल पक्षांमध्ये हा सण साजरा केला जातो. राजस्थानमध्ये होळी हा सण दोन दिवस साजरा करतात.
                         नवरात्र नवरात्र हा सण प्राचीन काळापासून चालत आलेला सण आहे. पावसाळ्यात पेरलेले पीक घरात आल्यावर राजस्थानी लोक  हा उत्सव साजरा करतात.  नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात. दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर देवाला वाहताात. या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
                             गणगौर उत्सव
गणगण हा उत्सव शंकर देव आणि पार्वती यांचा आहे.या उत्सवात शंकर आणि पार्वतीची पूजा केली जाते. राजस्थानमधील महिला सजून डोक्यावर पाणी भरण्यासाठी जातात. हा उत्सव सुखी व वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे.

                    संस्कृती
राजस्थान हे राज्य प्राचीन  इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.सिंधू संस्कृती राजस्थानच्या काही भागात विकसित झाली आहे. राजस्थान हे सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. सांस्कृतिक परंपरांनी आणि कलेने समृद्ध असलेले राज्य आहे.घुमार,झूमर, दांडिया,गीदंड, गौरी व भवई हे नृत्य प्रकार राजस्थानमध्ये लोकप्रिय आहेत. घूमर हे राजस्थान मधील स्त्रियांचे सामूहिक नृत्य आहे.होळी,गणगौर,दिवाळी लग्नासारख्या मंगल समारंभात राजस्थानी स्त्रिया हे नृत्य करतात. जैसलमेर,बिकानेर,मेवाड  या भागात हे नृत्य विशेष रूढ आहे.राजस्थानातील  बाहुल्यांचा खेळ वैशिष्ट्यपूर्ण आहे.  बाहुल्यांच्या खेळासाठी उदयपूर  येथील लोककला मंडळ विशेष प्रसिद्ध आहे.चित्रकला राजस्थानातील महत्त्वाची कला आहे. संगीत, नृत्य, नाट्य, चित्र शिल्प कलांची राजस्थानी परंपरा बरीच जुनी आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आढळणारी मंदिरे,मूर्ती, व चित्रे एक अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे.राजस्थान आभूषण, रंगीत कपडयांची विक्री केली जाते. देशी व परदेशी पर्यटक राजस्थानला भेट देण्यासाठी येतात.

No comments:

Post a Comment