Sunday, May 10, 2020

आई

                             आई
       
 आई  या  शब्दातच  किती  अर्थ  लपलाय आ  म्हणजे आत्मा  ई  म्हणजे  ईश्वर  आईबद्दल जितक  लिहाव तितके  कमीच  आहे .आई ही  जगातील  अशी  व्यक्ती आहे  जिला  काहीही  न सांगता आपल्या भावना तिच्यापर्यंत  पोहचत  असतात.आई  नऊ महिने आपल्या बाळाचा  पोटात सांभाळ करत असते.आणि  हिच  मुले मोठी झाल्यावर तिला आश्रमात टाकतात का तर त्यांंना आई  नको नको  वाटत असते.आईचा म्हतारपणी  त्यांंना त्रास  होत  असतो.आई   जरी  शिकलेली  नसली  तरी ती  आपल्या  मुलांना  नेहमी  सत्याचा मार्ग  दाखवत असते. आपण लहानाचे मोठे होईपर्यंत आईवर आपली खूप मोठी जबाबदारी असते. ती आपल्यासाठी  खूप काही करत असते. आपल्या प्रत्येक सुखात दुःखात आपली साथ देत असते. मुले  मोठी  झाली की  आईची किंमतच  विसरून  जातात. हया  जगात  व्यक्ती कितीही श्रीमंत  असला  तरी आईशिवाय  खूप  अपूर्ण आहे. आई नसती  तर  कदाचित  आपण  हया जगात नसतो.खरंच ज्याच्यांकडे  आई  आहे  ते खूप नशीबवान आहेत.आपल्याकडे  एखादी  वस्तू  असते  तेव्हा आपल्याला  त्या  वस्तूची  किंमत  समजत नाही .जेव्हा एखादी  व्यक्ती  हया  जगात  नसते  तेव्हा  त्याची किंमत कळते.आईची  जागा हया  जगात कोणीच  घेऊ  शकत नाही. जर  आई  थोडया  वेळासाठी  कुठे गेली  तरी घर किती शांंत  वाटते तर  तुम्ही  विचार  करा  ज्यांच्याकडे आईच  नाही  त्यांंना  जीवन  जगणे  किती  अवघड  होत  असेल.खरंच  जसा  आईने   लहानाचे  मोठे होताना  आपला  सांभाळ  केला  तसा  म्हतारपणी तिचा आधार  बना.हया  जगात  सगळ्यांंनाच  आईचे  सुख मिळत  नाही.
                                       
                                                       हर्षाली पटेल

Friday, March 20, 2020

राजस्थान संस्कृती

                     राजस्थान संस्कृती
                     प्रस्तावना
राजस्थान उत्तर भारतातील राज्य आहे. राजस्थान म्हणजे वाळंवटी प्रदेश.वाळवंटात हिरवाई तसेच धबधब्याने नटलेले असे निसर्गसंपन्न पर्यटन स्थळ आहे. भव्य राजवाडे ,कलात्मक हार,प्राचीन मंदिरे, निसर्ग मानव निर्मित सरोवरे ऐतिहासिक किल्ले असा राजस्थानच्या समृद्ध वारसा पर्यटनामध्ये झळाळून निघतो. राजस्थान मधील वातावरण आणि निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. पारंपरिक लोक संगीतापासून ते चविष्ट पाककलेपर्यंत अनेक बाबतीत बहुरंगी असलेले रंगीबिरंगी राजस्थान पहायला जगभरातील लाखो पर्यटन दरवर्षी येतात. भौगोलिक विविधता, ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य व विविधरंगी संस्कृती यामुळे राजस्थान मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करते. उष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे राजस्थानमध्ये शेतीचे प्रमाण कमी आहे. ज्वारी,मका,बाजरी,गहू ही राजस्थानमधील प्रमुख धान्य आहेत. ऊस, तेल, तंबाखू ही नगदी पिके आहेत. बनास ,लोनी, घग्गर, चंबर हया नद्या राजस्थानमधून वाहतात.
   प्राणी व पक्षी : राजस्थानात शुष्क हवामानाचे प्रमाण जास्त आहे .तसेच जंगलाचे कव्हरही अतिशय कमी आहे. राजस्थानमध्ये जैवविविधता जास्त आहे. कोरडे वाळवंट,शुष्क काटेरी जंगल अशा प्रकारची वने आढळतात. राजस्थान मध्ये शुष्क वातावरण असल्याने नैसर्गिक साधन संपत्ती कमी आहे येथे निसर्ग संवर्धनाला जास्त महत्त्व देतात.
   राजस्थानमध्ये  चिंकारा, काळवीट, रानगाढव, व भारतीय लांडगा हे वन्यजीव दिसून येतात. माळढोक हा राजस्थानचा राज्यपक्षी अतिशय दुर्मिळ आहे .गाढव हे  फक्त राजस्थानच्या वाळवंटी भागात व कच्छच्या रणात दिसून येते. वाळवंटी मांजर, वाळवंटी खोकड ,हे प्राणी राजस्थानमध्ये आढळतात. अरवलीच्या सानिध्यात अनेक अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने आहेत.राजस्थानमध्ये उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.

जयपूर,उदयपूर,जोधपूर ,जैसलमेर हे राजस्थान मधील ऐतिहासिक स्थळे आहेत.
                            जयपूर
  जयपूर हे शहर गुलाबी दगडांतील बांधकामामुळे प्रसिद्ध आहे.या  शहराला पिंंक सिटी म्हणताात. अंबर फोर्ट जयपूरच्या शासकांचे राहण्याचे ठिकाण आहे. टोलेजंग हवेल्याा, मोठे-मोठे दरबार, सुंदर बगीचे पाहायला मिळतात.
                           उदयपूर
उदयपुर राजस्थान मधील महालांचे महत्त्वाचे शहर आहे.  उदयपूरला मोस्ट रोमांटिक सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. प्रशस्त उद्याने,स्वच्छ पाण्याचे तलाव,जागोजागी उभारलेल्या सुंदर कमानी हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. म्युझियम राजवंशातील व्यक्तींचे फोटो व वस्तू यांनी सजलेले आहे. उदयपूरमधील महालांचे  रूपांतर हॉटेल्समध्ये करण्यात आले आहे.

                           जैसलमेर
जैसलमेर हे राजवाडे,हवेल्या,आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. जैसलमेर हे जगातील प्रसिद्ध वाळवंट त्यातील वाळूच्या टेकड्यांवर सुंदर दिसते.

                            जोधपूर
जोधपुर ब्लू सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. निळ्या रंगात रंगवलेली घरे,कोरीवकाम केलेले फर्निचर येथील वैशिष्ट्य आहे.जोधपूरच्या  आसमंतातील  किल्ले  हे व्यवस्थित  जतन  करून  ठेवले  आहेत. जोधपूरमधील मार्केट प्रवाशांचे आकर्षण आहे.

              भाषा-बोलीभाषा
राजस्थानमध्ये राजस्थानी ,मारवाडी, मेवाडी, मेवती इत्यादी भाषा बोलल्या जातात.

राजस्थानी - राजस्थानी ही भाषा राजस्थान, जोधपूर या भागात बोलली जाते.

मारवाडी - मारवाडी ही राजस्थान भाषेची बोली आहे. मारवाडी भाषा गुजरात, राजस्थान,मारवाड, मल्लानी, मेरवाढ, किशनगढ, सिरोही, पालनपुर, जैसलमेर, बिकानेर या भागात बोलली जाते.

मेवाडी -  मेवाडी भाषा दक्षिण राजस्थान, उदयपूर, भीलवाडा, चित्तोडगड इत्यादी भागात बोलली जाते.

मेवती - मेवती ही भाषा हरियाणा, राजस्थानमध्ये बोलली जाते.

                खाद्यसंस्कृती
राजस्थानमध्ये दाल -बाटी ,दाल बाफले, मिठाई, चटपटे गट्टे ,मावा ,मालपुआ,फरसाण इत्यादी खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. याशिवाय जेवाणात पनीरची भाजी, बाजरीची भाकरी, मुगाच्या डाळीचा साजूक तुपातला शिरा, पापड, कांजी वडे ,खस्ता बाटी,पंचमेली दाल,मखाना, पंजीरी, रसगुल्ला इत्यादी चविष्ट खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. चविष्ट चमचमीत खाद्यपदार्थ राजस्थानचे वैशिष्ट्ये आहे.राजस्थानमधील खाद्यपदार्थाचा पर्यटकांना आनंद घेता येतो.

                      वेशभूषा
राजस्थानी लोक रंगीबेरंगी कपड्यांच्या पेहरावासाठी प्रसिद्ध आहे.

महिलांची वेशभूषा -लेहंगा,  चनिया-चोली,घागरा, कुर्ती अशी राजस्थानी महिलांची वेशभूषा आहे.

पुरुषांची वेशभूषा - धोती ,कुर्ता,पॅन्ट, पायजमा अशी राजस्थानी पुरुषांची वेशभूषा आहे. राजस्थानी पुरुष डोक्याला फेटा बांधतात. त्याचे कपडे भडक रंगाचे असतात.

                        सण-उत्सव
                      उंट उत्सवराजस्थानमध्ये उंट उत्सव एक वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव  जाानेवारीमध्येे साजरा केला जातो. या उत्सवात  उंटाची स्पर्धा, उंटाची कला,उंटाचे सौंदर्य अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात.
                   मकरसंक्रांत
  मकरसंक्रांत  हा सण राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.विवध प्ररकारची रंगीत पतंग उडवले जातात. मकरसंक्रांतीच्या दिवशी पूर्ण राजस्थान एकत्र येऊन या सणाचा आनंद घेेेतात
                            होळी
होळी  हा सण राजस्थानमधील महत्त्वाचा सण आहे. फाल्गुन महिन्यात शुक्ल पक्षांमध्ये हा सण साजरा केला जातो. राजस्थानमध्ये होळी हा सण दोन दिवस साजरा करतात.
                         नवरात्र नवरात्र हा सण प्राचीन काळापासून चालत आलेला सण आहे. पावसाळ्यात पेरलेले पीक घरात आल्यावर राजस्थानी लोक  हा उत्सव साजरा करतात.  नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात. दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर देवाला वाहताात. या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
                             गणगौर उत्सव
गणगण हा उत्सव शंकर देव आणि पार्वती यांचा आहे.या उत्सवात शंकर आणि पार्वतीची पूजा केली जाते. राजस्थानमधील महिला सजून डोक्यावर पाणी भरण्यासाठी जातात. हा उत्सव सुखी व वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे.

                    संस्कृती
राजस्थान हे राज्य प्राचीन  इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.सिंधू संस्कृती राजस्थानच्या काही भागात विकसित झाली आहे. राजस्थान हे सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. सांस्कृतिक परंपरांनी आणि कलेने समृद्ध असलेले राज्य आहे.घुमार,झूमर, दांडिया,गीदंड, गौरी व भवई हे नृत्य प्रकार राजस्थानमध्ये लोकप्रिय आहेत. घूमर हे राजस्थान मधील स्त्रियांचे सामूहिक नृत्य आहे.होळी,गणगौर,दिवाळी लग्नासारख्या मंगल समारंभात राजस्थानी स्त्रिया हे नृत्य करतात. जैसलमेर,बिकानेर,मेवाड  या भागात हे नृत्य विशेष रूढ आहे.राजस्थानातील  बाहुल्यांचा खेळ वैशिष्ट्यपूर्ण आहे.  बाहुल्यांच्या खेळासाठी उदयपूर  येथील लोककला मंडळ विशेष प्रसिद्ध आहे.चित्रकला राजस्थानातील महत्त्वाची कला आहे. संगीत, नृत्य, नाट्य, चित्र शिल्प कलांची राजस्थानी परंपरा बरीच जुनी आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आढळणारी मंदिरे,मूर्ती, व चित्रे एक अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे.राजस्थान आभूषण, रंगीत कपडयांची विक्री केली जाते. देशी व परदेशी पर्यटक राजस्थानला भेट देण्यासाठी येतात.

Sunday, February 16, 2020

शेतकरी मुलाखत

दिनांक  11/2/20  ला  आम्ही  विरार  वेस्ट बोळिंज  रानपाडा  गावात  शेतकऱ्याची  मुलाखत  घेतली.  आम्ही. हेमलता  नारायण  घरत  यांची  मुलाखत  घेतली. त्यांच्या  शेतात आम्ही  त्यांची   मुलाखत  घेतली.  आम्हाला  शेतीबद्दल    त्यांनी   चांगल्या   प्रकारे   माहिती  सांगितली. आम्हाला  शेतीबद्दल  थोडी   फार   माहिती  मिळाली. नवीन ठिकाणी  नव-नवीन  गोष्टींचे ज्ञान मिळाले. शेतकऱ्यांना  शेतीत  खूप  कष्ट   करायला  लागते  कष्ट  केल्यानंतर   त्यांना  शेतीत  उत्पन्न  मिळते. उदरनिर्वाहासाठी  त्यांना शेतीवर  अवलंबून  राहावे  लागते. शेतकऱ्यांना प्रत्येक  पिकांची  व्यवस्थित  लागवड  करावी  लागते.
शेतकरी   आहेत  म्हणून   अन्न-धान्य, भाजीपाला   मिळते.  संपूर्ण  देश  शेतकऱ्यांवर   अवलंबून   आहे. उन्हाळा, हिवाळा,   पावसाळा   आला   तरी  शेतकऱ्यांना  कुठल्याही   परिस्थितीत 
शेतात  काम  करावे  लागते. शेतकऱ्यांचे  बहुतेक   वेळा   नुकसानही  होते. प्रत्येक  वेळी  शेतकऱ्यांना  पाहिजे  तसा नफा  मिळत  नाही. शेतकऱ्यांना  अनेक समस्यांना  सामोरे  जावे  लागते. शेतकऱ्याची  मुलाखत  घेतल्यावर   हे   चांगले  अनुभव  आम्हाला आले.
    
                प्रश्न-उत्तरे
1  तुम्ही किती वर्षांपासून शेती करतात ?
उत्तर : ते गेल्या  30  वर्षांपासून  शेती  करतात.
2  तुम्ही शेतात कोणते पिक घेतात ?
उत्तर : ते  अगोदर  शेतात  लाल पटणी, सफेद पटणी  हे  पिक  घ्यायचे  आता  ते  जास्वंद, बोर, केळी ,चिकू, आंबा,जांभूळ, नारळ,तुळशी, वांगी, मुळा,कोथिंबीर, पालेभाज्या, या पिकांची लागवड शेतीत करतात.
3  शेती करत असताना तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ?
उत्तर : खाऱ्या  जमिनीला  जी  झाडे  येतात  ती काढावी  लागतात.उखळण  करावी  लागते  उखळण  करताना  त्यांना जमिनीतील  माती  बारिक  करावी  लागते.  खाऱ्या  जमिनीवर  गोडी  माती  टाकावी   लागते  परत. टयाक्टर
लावावा  लागतो.जमिनीला  पाणी  दयावे  लागते. जमिनीला  पाणी  दिल्यानंतर  त्यांना  शेतात  पिक  घेता  येते   त्याच्यांकडे  8  महिने पाणी  नसते  पावसाळ्यात त्याच्यां शेतात पूर येतो  पिकांचे  नुकसान  होते  इत्यादी  समस्यांना  सामोरे  जावे लागते.
4  युवा  पिढीला  तुम्ही शेतीबद्दल  काय  सांगाल ?
उत्तर :  आजची  युवा  पिढी  शेती  करणार  नाही. आजची युवा  पिढी   तंत्रज्ञानाच्या  मदतीने  पुढे प्रगती करत आहे त्यामुळे  शेती मागे  पडत   चालली  आहे  शेतीत   उत्पन्न   खूप   आहे   फक्त  आपल्याला  मेहनत  घ्यायला  लागते.
5  पूर्वीची  शेती  आणि  आधुनिक  शेती  यामध्ये   तुम्हाला  काय  फरक वाटतो  ?
उत्तर  :  पहिला  ते   हाताने   जमीन  खोदून  शेती  करायचे  आणि  आता  त्यांनी  सरकारच्या  मदतीने   स्वतः चा   ट्याक्टर  घेतलाय. ट्याक्टरच्या  मदतीने   शेतात   शेती  करतात  त्यांचे   कुटुंब   उदरनिर्वाहासाठी   शेतीवर   अवलंबून   आहे.
6  तुम्हाला  शेतीतून  किती  उत्पन्न  मिळते ?
उत्तर :  त्यांना  महिन्याला  4000/- रू  पैसे  मिळतात   ते त्याच्या  शेतातील  तुळशी हे पिक  मुंबईला  बाजारपेठेत  विकतात  प्रत्येक  वेळी  पाहिजे  तसा नफा  मिळत   नाही  त्यांचे  नुकसानही   होते. बाजारपेठेत विकल्यानंतर  त्यांना  पैसे मिळतात.
7  तुम्ही  शेतीत  पिकांची  लागवड  कधीपासून   करतात ?
उत्तर : साधारणपणे  ते  हिवाळ्यापासून  शेतीत पिकांची  लागवड  करतात.शेतीत  पिकांची लागवड  करताना  त्यांना  खूप  त्रास  होतो. त्यांची  खारी  जमीन  आहे .खाऱ्या  जमिनीत गोडी  माती  टाकून  त्यांना  शेती करावी  लागते. खाऱ्या  जमीनीत  सहजासहजी  पिकांची लागवड  होत  नाही .बहुतेक  वेळा  त्यांच्या पिकांचे  नुकसान  होते.त्यांना  पाण्याचा  पण त्रास  आहे. त्यांनी  त्यांच्या   शेतात   एक  खड्डा खणलाय  त्या   खडड्यात   ते  पावसाचे  पाणी साठवून  ठेवतात  त्या  पाण्याचा  शेतीत  वापर करतात.
8  तुम्ही  शेतीत  कोणत्या  खतांचा  वापर  करतात ?
उत्तर : शेतात  युरिया,  सल्फेट, हे  खत  वापरतात.
युरिया : युरिया  खत  रासायनिक  खत  आहे युरिया हे पिकांच्या  उत्पादनासाठी  आणि जमीनीची  सुपीकता  वाढविण्यासाठी रासायनिक  खतांचा  वापर  करतात  युरियेच्या चुकीच्या  वापरामुळे  जमीन संक्रमित होते. युरियच्या अधिक  वापरामुळे जमीनीवर दुष्परिणाम होतो.
सल्फेट  :  सल्फेट   खताचा  वापर  पिकांची क्षमता  वाढविण्यासाठी  शतीत  फवारणी करतात. सल्फेट  खताचा  वापर   अधिक  उत्पादनासाठी  योग्य  वेळी  समान  प्रमाणात खतांचा  वापर  करणे  आवश्यक  आहे.
9  शेतीमधील  जमीन  कशी  आहे हे  कसे  ओळखता ?
उत्तर :  ज्या  जागांना  जमीनीत  भेगा  पडलेल्या असतात  त्या  जमिनीत  पिकांची  लागवड  केली  जात  नाही  ती  नापीक  जमीन असते.जी माती  सुपीक  असते  त्या  जमिनीत  पिकांची लागवड  केली  जाते  यावरून  जमीनीची  ओळख   होते.
         
10  शेती  करत  असताना  तुम्ही  अजून कोणता व्यवसाय  करतात ?
उत्तर :  शेती   करत  असताना  त्या  मासेमारी  व्यवसाय  करतात  मासे  विकतात. मासे  विकून थोडे  फार  पैसे  मिळतात  त्यांच्या घरात  कोणी कामाला  जात  नाही  त्यामुळे  त्यांनी  शेती व्यवसाय  सुरू  केलाय.उदरनिर्वाहासाठी शेती व मासेमारीवर  अवलंबून  आहेत.

Monday, February 3, 2020

सौरऊर्जा


मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरज आहे. परंतु त्याचबरोबर तितकीच महत्त्वाची गरज आहे ती ऊर्जेची.शरीराला लागणाऱ्या ऊर्जेचे इंधन म्हणजे दगडी कोळसा, लाकूड, खनिज तेल,वायू व वीज मनुष्य, प्राणी, वनस्पती यांच्या पोषणासाठी उष्णता व प्रकाश निर्माण करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे.प्राचीन काळापासून लाकूड हाच मानवांचा एकमेव ऊर्जास्त्रोत होता. सतराव्या शतकातपर्यंत लाकूड वापरले जायचे. विदयुत शक्तीने तर जगाचे स्वरुप पालटून टाकले. पुढील तीन शतकात मानवी संस्कृतीने प्रगती केली आहे. विदयुत शक्तीवर चालणारी हजारो नवी उपकरणे यंत्रे तयार झाली. आज घरातील बरीचशी कामे विजेच्या साहाय्याने होतात. रस्त्यावरील लहान मोठी वाहने ही खनिज,पेट्रोलियम पासून शुद्ध केलेल्या पेट्रोल डिझेलवर चालतात.अतिशय जंगलतोडीने जगातील मोठमोठी जंगले नष्ट झाली आहेत.त्यातून प्रदूषणाची दुसरी समस्या उभी राहिली आहे. कारखान्यातून निघणारा धुर,वाहनांमधून उत्सर्जित होणारे कार्बन मोनाक्साईडमुळे वातावरणात बदल झाला आहे.मानवाचे आर्युमान घटण्याची शक्यता आहे. लोकसंख्या व शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वीज अपुरी पडू लागली आहे. एका 20 मजली इमारतीला जितकी वीज लागते त्यापेक्षा असते
      ऊर्जेचा वापर करण्यावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु झाले आहेत. रस्त्यावर सौर दिव्यांची यंत्रणा बसवून खेडेगावापर्यत प्रकाश पोहोचवण्याचे प्रयत्न देशपातळीवर सुरु आहेत.विजेचा पुरवठा अखंड राहण्याकरिता आणि ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याकरिता सौरऊर्जेचे प्रकल्प महाराष्ट्रात आणि इतर राज्यात उभारले जात आहेत. भारत हा देश ऊर्जेचा देश आहे म्हणून ओळखला जातो. वीजनिर्मिती करिता ,पाणी गरम करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ वाळविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील निरनिराळ्या कमांकरिता सौरऊर्जेचा वापर करू शकतो. आपल्या देशात अजूनही 65% जनता ग्रामीण भागात असून अन्न शिजवण्यासाठी जंगलातील लाकडांचा वापर करतात.मोठ्या प्रमाणात कार्बनची निर्मिती थांबवून पर्यावरणाची हानी टळू शकेल.

Sunday, February 2, 2020

मोबाईल


मोबाईल हा आताच्या जगात लोकांचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे . मोबाईल मुळे दूरपर्यंत लोकांशी संपर्क साधू शकतो प्रत्येक वेळी आपल्याला तिथे जाणे शक्य नसते जगभरातील सगळ्या प्रकारची माहिती आपण मोबाईलवर पाहु शकतो आजकाल लहानापासून मोठ्यापर्यत सगळे मोबाईलचा वापर करतात आता पुर्वी सारखे नही आहे एखाद्याला संदेश पाठवायचा असेल तर आपण लगेच त्या व्यक्तीला फोन करु शकतो. मोबाईल हे जणू ज्ञानाचे भांडारच आहे.मोबाईलवर अनेक विडियो, चित्रपट, गाणी, ई-पेपर विविध प्रकारची माहिती पाहू शकतो. मोबाईल एक प्रकारचा मनोरंजनाचे साधन सुद्धा आहे. लहानातल्या लहान मुलांना मोबाईलचे ज्ञान आहे. मानव पुस्तक वाचण्याऐवजी मोबाईलला महत्त्व देत आहे. मोबाईल मानवाच्या कुटुंबातील एक सदस्य झाला आहे पण मोबाईलचा पाहिजे तिथेच उपयोग व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात अस होत का? मुले मोबाईलवर नको-नको ते बघत असतात. आई-वडिल सुद्धा जिद्दीने हट्ट पुरवतात रोजच्या दैनंदिन जीवनात पाहत आहेत की मोबाईल शिवाय जगणे कसे अवघड झाले आहे. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यत आपण सर्व क्रिया मोबाईलवर करत असतो.
            सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या जवळचा मोबाईल दूर गेला किंवा चार्जिंगला लावलेला असेल तरीसुध्दा आपण त्यामध्ये येणारे मेसेज वाचण्यासाठी सतत मोबाईल पाहत असतात. मोबाईलमुळे आपले जीवन जेवढे सुखी  झालेले पाहतो तेव्हा दु:खी पण झालेले आढळून येते. मोबाईलचा फायदा आहे तितका तोटासुद्धा आहे.मोबाईल आल्याने सर्व लोक मोबाईलवर व्यस्त असतात. एकमेकांशी बोलणे तर दूरच एकमेकांकडे बघत  सुद्धा नाही. मोबाईलचा अनेक मुलांवर प्रभाव पडला आहे. लहान वयातच चश्मे लागले आहेत. शाळकरी मुले सांगितलेला अभ्यास वेळेवर पूर्ण होत नाही.मान्य आहे युग तंत्रज्ञानाचे आहे परंतु तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य वेळी योग्य ठिकाणी झाला पाहिजे त्यासाठी काही बंधने असायला पाहिजे. लहान शाळकरी मुलांकडे पाहतोय की स्मार्ट फोनचा वापर केला जात आहे पण त्याचा वापर योग्य होतो की नाही याची खात्री होणे गरजेचे आहे.
     
       
     

आजच्या तरूणाईची बदललेली भाषा

आजच्या पिढीची सगळयात मोठी समस्या मोबाईल आहे. मोबाईलने त्याचे आयुष्यच बदलून गेले आहे. आजची पिढी आई-वडिलांपासून दुरावत चालली आहेत.शहरांमध्ये मुले शाळेत कॉलेजात नोकरीमध्ये व्यस्त असतात यांच्यातील जवळीकता संवाद कमी होताना दिसून येतो.मोबाईलच्या अतिवापराने तरुणाईच्या मनावर परिणाम होतात.साहजिकच जगण्याच्या स्पर्धेत संवाद तुटत जातो.आधुनिक युगात जगत असताना घरातल्या माणसापेक्षा आपल्यासाठी आपला मोबाईल प्रिय वाटू लागला.मोबाईलमुळे त्यांची भाषा बदलत चालली आहे. तोडांने बोलण्याऐवजी हाताने हातवारे करून संवाद साधत आहेत. जीवनात सोप्या पद्धतीने भाषेचा वापर करत आहेत. आजची पिढी आधुनिक उपकरणाच्या आहारी इतकी गेलेली आहे की त्यांना वाचन, गायन, मैदानी खेळ आणि त्या माध्यमातून विकसित होणारी बुद्धी, घडणारे मन अन शरीर यांचे महत्त्व राहिलेले नाही. संस्कार असलेले कार्यक्रम त्यांना आवडतच नाही त्यांना डिजे, हिप-हॉप यांसारखी गाणी आवडत आहेत.संगणक आणि मोबाईल यांवरच सर्व सोयी उपलब्ध असल्याने कामचोरपणा आणि आळशी वृत्ती बळकावत चालली आहे. आदर,समानता ही मूल्य आजच्या पिढीला कळतच नाही.
मुलांचे आजचे वेळापत्रक इतके व्यस्त असते की त्यांची स्थिती स्पर्धेतील घोड्यासारखी झाली आहे. शाळा, अभ्यास, शिकवणी यातच अधिक वेळ जात असल्याने मिळणाऱ्या रिकाम्या वेळेत संगणकीय खेळ व मोबाईल वरील खेळ, फेसबुक, व्हॉट्स अप यात गुंतून राहतात. त्यामुळे मैदानी खेळ मागे पडले आहेत. मुलांना योग्य मार्गदर्शन दिले पाहिजे.मुलांनी कामाच्या वेळीच मोबाईलचा वापर केला पाहिजे. समाजाला बळकट करण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये असल्याने महिलांनी आजची युवा पिढी सुदृढ व संस्कारक्षम बनविण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे.आजची युवा पिढी संस्कारक्षम झाली तर आपल्या भारताला प्रगत व्हायला वेळच लागणार नाही.

दूरदर्शन

दूरदर्शन 1920 साली यांत्रिकी करामतीमधून सुरु झालेला प्रवास आज त्रिमिती अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रापर्यत झाला आहे. अवकाशातल्या परग्रहावरच्या हालचाली सुद्धा आपण घरबसल्या पाहू शकतो.26 जानेवारी 1926 साली  टेलिव्हिजनचा दूरचित्रवाणीचा शोध लावला. जॉन लॉगी बेअर्ड या वैज्ञानिकांने टेलिव्हिजनचा शोध लावला. पुढे 1927 साली अमेरिकेत दूरचित्रवाणीच्या प्रक्षेपणाला सुरुवात झाली.1950 साली बीबीसी लंडन या वाहिनीने पहिल्यांदा व्यावसायिक पातळीवर दूरचित्रवाणीच्या प्रक्षेपणाला सुरुवात केली.9 ऑगस्ट 1984 साली दिल्लीत दूरदर्शनचे पहिले क्रेंद सुरु करण्यात आले.भारतीय माध्यमातील इलेक्ट्रॉनिक युगाची सुरुवात दूरदर्शनमुळे झाली.58 वर्षापूर्वी दूरदर्शनचे सगळ्यांना नवल वाटायच.हलती डोलती चित्र डोळ्यासमोर हे त्याच्यासाठी नवीनच होत याची कल्पना करणे कठीण आहे. दूरदर्शनचा प्रसार देशभर पसरला. दूरदर्शन बघणारा प्रेक्षक हळूहळू वाढत चालला.
  
  दूरदर्शनवरून बातमीची सुरुवात 1965 पासून सुरु झाली.1972 मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण देण्याचा प्रयोग भारतात केला. जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रसार घरोघरी करण्यात आला.1982 साली देशात एशियाई क्रीडा स्पर्धामुळे दूरदर्शन खेड्यापाडयात पोहचले.लोकांना टीव्हीची नाही तर भाकरीची गरज होती. ज्या खेड्यात वीज नव्हती तिथे आल्यावर अनेकांना पहिल्यांदा दूरदर्शन संच विकत घेतले. टीव्हीमुळे लोकांचे मनोरंजन व्हायचे.पूर्वी दूरदर्शनवर 1 तासाचा चित्रपट असायच दर शनिवारी एक तासाच्या कार्टूनचे कार्यक्रम असायचे.प्रत्येक कार्यक्रमासाठी डझनवारी 24.तासांच्या वाहिन्या  सुरु झाल्या आहेत. सुमारे वीस वर्षापुर्वी सर्व कुटुंब एकत्रितपणे दूरदर्शनचे कार्यक्रम बघायचे. दूरदर्शनमुळे अनेक कलाकारांना चित्रपटात रोजगाराची संधी मिळाली.
     प्रेक्षक वर्गाना खेळवून ठेवण्यासाठी व आपल्या चैनलची लोकप्रियता वाढविण्यासाठी व जाहिरातीच्या युगामध्ये आपले चैनलचे अस्तित्व टिकवण्यासाठी नवनवीन कल्पना सुचवून टीव्ही सिरियलची निर्मिती करण्यात आली. दूरचित्रवाणीला जरी इडियट बॉक्स जरी म्हणत असले तरी त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. हे नाकारता येत नाही सध्याच्या काळात टीव्हीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात वाढत चालण्याचे दिसून येते.
उदाहरण- रामायण, महाभारत,इत्यादी कार्यक्रमांनी लोकांना आकर्षित केले.
    दूरदर्शनचे फायदे
1 टेलिव्हिजन मुळे सगळ्याचे मनोरंजन होते.
2 वेळ पटकन निघून जातो.
3 देशाभरातली माहिती मिळते
4 मनाला आराम मिळतो
5 अनेक कलाकारांना रोजगार मिळाला
   दूरदर्शशनचे तोटे
1 डोळ्यांना हानी  होते
2 दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहत जेवल्यास वाईट परिणाम होतो
3 अयोग्य कार्यक्रम पाहिल्यामुळे कुसंस्कार होतात
4 वाईट सवयी लागून भावी आयुष्यावर विपरीत परिणाम होतो
5 भुतांच्या विषयी असलेल्या मालिका पाहून मुले घाबरतात आणि रात्री झोपेत दचकून किंचाळून किंवा रडत उठतात
6 परिक्षा जवळ आली तरी मुलांना दूरदर्शन वरचा कार्यक्रम पाहण्याचा मोह आवरत नाही
7 कुटुंबाला वेळ देत नाही.
          

यंत्रमानव(रोबोट)

यंत्रमानव हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जे मानवाची आज्ञा पाळते.मानवी आयुष्यातील भाग झाला आहे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीपासून घरगुती कामांसाठी ते मोठ-मोठ्या औद्योगिक कामापर्यत यंत्राचा वापर माणूस करत आहे. वैज्ञानिक क्रांतिमुळे निरनिराळे शोध लागले आणि त्याचा वापर माणूस दैनंदिन जीवनात करू लागला. होकायंत्रापासून छपाईची यंत्रे,टंकलेखन. गणनयंत्र,वाफेच्या इ़जिनिचा शोध दुचाकी, चारचाकी गाडी, विमान ते दूरचित्रवाणी ,संगणक ,उपग्रह इत्यादी यंत्राच्या निर्मितीमुळे मानवी जीवनात अधिकाधिक सुलभता येत गेली.मानवाप्रमाणे हालचाली करणारा यंत्रमानव रोजच्या व्यवहारात हालचाल करण्यासाठी बनवला जात असला तरी माणसे पण आताच  यंत्रमानव स्मार्ट झाला आहे. आतापर्यंत यंत्रमानव हॉलिवूडमध्ये दिसत होते. चित्रपटाच्या आभासी जगातील यंत्रमानव मानवी जगात उतरले आहे. अकुशल कामाच्या ठिकाणी यंत्रमानवाचा वापर होऊ शकतो. जिथे फार बुद्धी वापरावी लागत नाही. यंत्रामुळे पारंपरिक उद्योग व्यवसाय नष्ट होतील.
          तंत्रज्ञान जसजसे प्रगती करते तसतसे त्याला हाताळणाऱ्या ती तयार करणाऱ्या मानवी हातांची आणि बुद्धीचीही गरज लागतेच.दुसरीकडे जिथे मानवाला जाता येत नाही अशी ठिकाणी यंत्रमानव पाठवण्याचे प्रयत्न वैज्ञानिकांनचे नेहमीच सुरु असतात. वैद्यकीय क्षेत्रात क्रित्येक शस्त्रक्रिया यंत्राच्या साहाय्याने केल्या जातात.आता इंटरनेटवरील माहीतीचा वापर करून हालचाली करणाऱ्या यंत्रमानवाची निर्मिती केली जाते. अशी मानवरहित  युद्ध यंत्रणा विकसित होऊ शकते.मानवी बुद्धीने त्याच्या आरंभापासून जसजशी भरारी घेऊन कामे नवनवीन गोष्टीची त्याने निर्मिती केली.आपले जीवन यंत्राच्या साहाय्याने सुखदायक झाले आहे.
                

इलेक्ट्रॉनिक मिडिया

सध्या इलेक्ट्रॉनिक मिडियाची संख्या वाढत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही वर्तमानपत्राचे महत्त्व समाजात कायम राहिले आहे. वर्तमानपत्रातील वैचारिक लिखाणामुळे समाजात सकारात्मक आणि चांगले बदल  होऊ शकतात.पूर्वीच्या काळात वर्तमानपत्रांसाठी आजच्या सासखे अनुकूल तांत्रिक वातावरण नव्हते.पूर्वीच्या काळात ईमेल,इंटरटनेट   इत्यादीश सुविधा उपलब्ध होत नव्हती. कामकाजाच्या अनुषंगाने वर्तमानपत्राच्या माध्यमातून सगळ्यांना मिळत होती.समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टी या दोन्हीही संदर्भात माध्यमाचे स्थान   महत्त्वाचे असते. सर्वसामान्यपर्यत सर्वात जलद पोहोचण्याचे प्रभावी माध्यमे इलेक्ट्रॉनिक माध्यमे समोर आली. आज कोणत्याही माध्यमात काम करणारी व्यक्ती ही बहुआयामी आणि एकाच वेळी अनेक अवधान सांभाळणारी असावी लागते. आज इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये येणारा तरुण वर्ग बुद्धिमान आहे आणि पत्रकारितेकडे करिअर म्हणून पाहत  आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यम हे आव्हानात्मक क्षेत्र नक्कीच आहे. युवक ही आजची इलेक्ट्रॉनिक माध्यमांची प्रमुख गरज आहे. प्रसार माध्यमे समाजाचा आरसा आहे. तरुणाचा कल इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडे अधिक असल्याचे आढळून आहे. इंटरनेच्या माध्यमातून एक अभासी जग प्रत्येक जण तयार करत असतो.

ओव्हन

आज तंत्रज्ञानाच्या मदतीने सगळी कामे सोपी झाली आहेत. रोजच्या आहारात पूर्वी पाव, बिस्कीट,केक यांचा समावेश नसायचा आता मात्र घरातही पदार्थ बनले जातात. वीजेवर चालणारा ओव्हन वापरला जातो.ओव्हनमध्ये जी उष्णता तयार होते ती रेडिएशनद्वारे आतील पदार्थाला मिळते आणि तो पदार्थ शिजतो.आजकाल बऱ्याच घरांमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन वापरला जातो. अगदी  काही सेकंदाच्या आतच चहासकट कुठलाही पदार्थ पटकन गरम होऊ शकतो. बरेच जण पॉपकॉर्न किंवा साबुदाणा खिचडी असे पदार्थ ओव्हनमध्ये करतात.यासाठी भांडी वापरावी लागतात. मायक्रोवेव्ह रेडिएशन धरतीवर चालत आहे.पदार्थ शिजवण्यासाठी रेडिएशन ऊर्जा किंवा  विदयुत चुंबकीय लहरी असतात याच घट्ट बंद कराव लागत आणि उघडल तर पदार्थ शिजण्याची किंवा गरम होण्याची प्रक्रिया बंद पडते.शरीराला पारंपरिक पद्धतीने शिजवलेला पदार्थ शरीराला हानिकारक ठरू शकतो. इंधनाची वेळेची आणि पैशाचीही बचत होते. सगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आल्याने माणसे काम करायला आळशी करतात त्याना सगळं आयते पाहिजे असते. दिवसेंदिवस माणूस आळशी होत चाललाय त्यांना काम करायला कंटाळा येतो सगळीच कामे तंत्रज्ञान करणार तर माणसे काय कामे करणार हाच प्रश्न मला नेहमी पडत असतो?
       

रेडिओ

आकाशवाणी हे मनोरंजनाचे व माहितीचे श्राव्य माध्यम आहे. ग्रामीण लोकांचे आवडते माध्यम आहे. रेडिओचा शोध 1885 साली मार्कोनी याने लावला. भारतात रेडिओची सुरुवात 1923 साली झाली. स्वतंत्रानंतर भारतात रेडिओची मोठी भरभराट झाली. विविध भारताने रिडिओवरच्या मनोरंजनाला एक वेगळी उंची बहाल केली. टीव्हीच्या आगमनानंतर रेडिओचा प्रसार कमी झाला. रेडिओच्या बाजाराची व्याप्ती वाढण्यास रेडिओच्या माध्यमातून जाहिराती आणि सामाजिक संदेश प्रसारित केले जायचे.आतापर्यंत रेडिओच्या माध्यमातून हजारो जिंगल्स जन्माला आल्या आहेत.
        आकाशवाणी ही भारताच्या विविध प्रदेशात अनेक वेगवेगळ्या सेवा पुरविते.ही सर्वात जास्त व्यावसायिक तसेच सर्वात जास्त प्रसिद्ध सेवा आहे. सध्या रेडिओच्या आवाजावर अनेकांचे लक्ष केंद्रित होऊ लागले आहे. आकाशवाणीच नव्हे तर इतर माध्यमातूनही  आवाजाचा वापर वाढला आहे. माध्यमांप्रमाणे रेडिओचा व्यवसायही जाहिरातीवर चालत असतो. रेडिओ हे साधन सोपे स्वस्त असल्याने अनेक उत्पादने आपल्या जाहिराती रेडिओच्या माध्यमातून देण्याला पसंती देतात. पूर्वीचे माणस रेडिओ ऐकायला पसंत करतात. सकाळी 11 वाजता सिनेमातली गाणी लागायची. संध्याकाळी 7 वाजता बातम्या लागायच्या.पूर्वी पूर्ण कुटुंब एकत्र बसून रेडिओ वरची गाणी ऐकायचे. आता कोणाला वेळ मिळत नाही आता सगळे आपल्या कामात व्यस्त असतात. पूर्वी रेडिओच्या लोकांच्या जीवनात महत्त्वाचा वाटा आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या घोषणे अंतर्गत सुरु.झालेल्या रेडिओचा प्रवास सर्वसमावेशक आहे. टीव्ही प्रमाणे सगळ्या गोष्टी आयत्या देण्याचा मार्ग रेडिओमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे विचार करायला ,कल्पना करायला उपलब्ध नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संधी,औपचारिक व अनौपचारिक शिक्षण याचा समावेश रेडिओ आपल्या विविध कार्यक्रमातून करत असतो. आता रेडिओ कोणाकडे सहजा-सहजी बघायला मिळत नाही. टीव्ही आल्यानंतर रेडिओचा प्रसार कमी झाला.

तंत्रज्ञान

तंत्रज्ञान काळाची गरज आहे. हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. चाकाचा शोध लागल्यामुळे मानवाला अधिक अंतर कापण्यासाठी तंत्रज्ञान लाभले. आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान टेलिफोन, इंटरनेट या तंत्रापर्यत मानवाने तंत्रज्ञान विकसित केले आहे.तंत्रज्ञान विकासामुळे मानवाचे जीवन अधिक सोयिस्कर बनत चालले आहे. माहिती साठवण्यासाठी, प्रक्षेपित करण्यासाठी,माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी विदयुत उपकरणे म्हणजे तंत्रज्ञान.यामध्ये रेडिओ, दूरदर्शन, विडियो व सुविधा संगणक त्यासंबंधित हार्डवेअर आणि अशा गोष्टीचा समावेश समावेश होतो. सामाजिक सुधारणा,विकास, संपर्काची साधने ,दळणवळण स्वास्थ्य व इतर सर्व बाबतीत झालेली प्रगती तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहे. आजच्या जगात जागतिक स्तरावर स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवे तंत्रज्ञान अधिकाधिक प्रमाणात विकसित असणे आवश्यक आहे. अनेक शास्त्रज्ञाने तंत्रज्ञान तयार केले आहे आणि विकासाच्या स्तरावर आहेत अजुन अनेक क्षेत्रात आपल्याला भारतीय समस्यांवर तोडगा काढायला हवा.
                  आज देशात 20 अणुवीज केंद्रे आहेत या केंद्रीभोवतीच्या पर्यावरणाचा अभ्यास. त्यासाठी प्रयोगशाळा केल्या जात आहेत.तंत्रज्ञान जीवनपद्धतीचा प्रत्येकाने स्विकार करणे गरजेचे आहे.रेल्वेचे टिकिट काढण्यासाठी दोन तीन तास उभे राहण्याची गरज नाही. ऑनलाइन सुविधेमुळे बस,रेल्वे, विमान प्रवासाचे टिकिट बुक करणे सोपे झाले आहे. अशा सर्व बेसिक गोष्टी शिकून घेण्याची गरज आहे. नवे तंत्रज्ञान शिकण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आज आपण सगळी ऑफिसची कामे घरी करू शकतो. मात्र युवा पिढी त्याचा गैरवापर करताना दिसत आहे. तंत्रज्ञानमुळे शिक्षणात प्रगती होते चालली आहे. तंत्रज्ञानाच्या सुविधेमुळे सर्वच प्रकारचे ज्ञान व शिक्षण सहजपणे उपलब्ध आह.आता अनेक प्रगत आणि विकसित देशांनी बिझिनेस प्रोसेस आऊटसोर्सिग ,इजिनीअरिंग सर्विसेस आऊटसोर्सिंग आणि नॉलेज प्रोसेस या क्षेत्राची कामे भारतात करायला  सुरुवात केली आहेत.परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुलीदेखील मुलांप्रमाणे सर्व प्रकारच्या शिक्षणात अग्रेसर होत आहे. मुलीनाही शिक्षणाची संधी तंत्रज्ञानाचे लाभ मिळत आहे.
   
                   तंत्रज्ञानाचे फायदे     
1 माहिती तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण पद्धती प्रभावी व सर्वसमावेशक आहे.
2  माहिती तंत्रज्ञानामुळे शिक्षणाची संधी सर्वत्र उपलब्ध होते.
3  विकासासाठी माहिती व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण पद्धती उपयुक्त आहे.
4  जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञानाचे फायदे सर्वत्र उपलब्ध होऊ लागले आहेत.
5 स्त्री सक्षमीकरणासाठी माहिती व तंत्रज्ञानाची भूमिका सकारात्मक व महत्त्वपूर्ण आहे.
  
             तंत्रज्ञानाचे तोटे
1 पुस्तकांचे महत्त्व व वाचनाचे प्रमाण कमी होत  आहे.
2  तंत्रज्ञानाच्या अतिवापराने डोळे तसेच आरोग्यावर परिणाम होत आहे
3 महागडे तंत्रज्ञान  गरिबांना न परवडणारे आहे.
4  विद्यार्थी वर्ग एकलकोंडा व निराश्याने ग्रस्त होत चालला आहे.
5 अनेक गैर वापरासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
   
         
      
       
    
    

संगणक

संगणक हे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे.संगणक यंत्राचा वापर आकडेवारी करण्यासाठी केला जात असे परंतु दिवसेंदिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व संगणकाचा वापर अनेक प्रकारे होऊ लागला. माहिती पाठवणे, तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही चित्रीकरण अन्य असंख्य कामासाठी संगणकाचा वापर होऊ लागला आहे. संगणक माहिती स्वीकारणारे दिलेल्या सूचना नुसार देणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात बदल घडवून आणले आहेत. संगणकाने मानवाची सगळी कामे घरबसल्या करू शकतो. संगणकामुळे खर्च व वेळेची बचत होते.संगणकाचा रेल्वे, विमान, आरोग्य, उद्योगधंदे,शिक्षण, संशोधन, विदयुभाग इत्यादी क्षेत्र विविध कार्यासाठी उपयोग केला जातो. संगणकाचा वापर दैनंदिन जीवनात होत आहे. आज घरबसल्या सर्व कामे संगणक करत असतो मानवाला रोजगार मिळत असतो.
          संगणक प्रत्येक्ष विद्यार्थ्यांना माहिती देत असतो. डिजिटल संगणकाचा वेग खूप प्रमाणात वाढला आहे. बाजारात 3Gh या पेक्षा जास्त वेगाने चालणारे संगणक बाजारात उपलब्ध झाले आहेत.आजच्या  युगात संगणकाचे ज्ञान असणे काळाची गरज बनली आहे. आज कुठलेही ठिकाण शिल्लक राहिले नाही की  जिथे संगणकाचा वापर होत नाही. अनेक वेळा आपल्याला लिंक्स पाठवल्या जातात अशा लिंक्स या http स्वरूपात असतात अशा लिंक्स ओपन करू नयेत ज्या लिंक्समध्ये http असते. त्याच लिंक्स सुरक्षित असतात त्यातून तुमच्या संगणकामध्ये व्हायरस येऊ शकतो. तसेच संगणकामधील माहिती चोरी होण्याचीही भिती असते. सध्या समाजात अनेक प्रकारच्या अफवा आणि खोटी माहिती पसरवली जात आहे त्यामुळे समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनोळखी फोन नंबरच्या माध्यमातून लोका़ची फसवणूक होत असल्याचे अनेक गुन्हे घडत आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपली वैयक्तिक माहिती समाज माध्यमातून खुली करू नये. सध्या फेक न्यूज ,अफवा, तेढ निर्माण करणारे मेसेज या गोष्टीविषयी कायदे आहेत.
आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोग केला जातो
1  गणिती सूत्र कितीही अवघड. असले तरी योग्य सूचना दिल्यास संगणक ते  चटकन सोडवतो.
2  संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती साठवून ठेवता येते.साठवून ठेवलेल्या माहितीमधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लगेच संगणक आपल्या समोर ठेवतो.
3 संगणकाचा उपयोग करून आलेख,तसेच रंगीत चित्र पटकन काढता येतात.
4 उद्योगधंदे ,व्यापार,कॉल सेंटर ,शेअर मार्केट,शाळा ,महाविद्यालय,टिकिट, रिजवेर्शन अन्य क्षेत्रात उपयोग होतो
5  इंजिनिअरला घराचे ,इमारतीचे तसेच पुलाचे
डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या मदतीने तो पूर्व नकाशा बनवू शकतो.