सध्या इलेक्ट्रॉनिक मिडियाची संख्या वाढत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही वर्तमानपत्राचे महत्त्व समाजात कायम राहिले आहे. वर्तमानपत्रातील वैचारिक लिखाणामुळे समाजात सकारात्मक आणि चांगले बदल होऊ शकतात.पूर्वीच्या काळात वर्तमानपत्रांसाठी आजच्या सासखे अनुकूल तांत्रिक वातावरण नव्हते.पूर्वीच्या काळात ईमेल,इंटरटनेट इत्यादीश सुविधा उपलब्ध होत नव्हती. कामकाजाच्या अनुषंगाने वर्तमानपत्राच्या माध्यमातून सगळ्यांना मिळत होती.समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टी या दोन्हीही संदर्भात माध्यमाचे स्थान महत्त्वाचे असते. सर्वसामान्यपर्यत सर्वात जलद पोहोचण्याचे प्रभावी माध्यमे इलेक्ट्रॉनिक माध्यमे समोर आली. आज कोणत्याही माध्यमात काम करणारी व्यक्ती ही बहुआयामी आणि एकाच वेळी अनेक अवधान सांभाळणारी असावी लागते. आज इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये येणारा तरुण वर्ग बुद्धिमान आहे आणि पत्रकारितेकडे करिअर म्हणून पाहत आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यम हे आव्हानात्मक क्षेत्र नक्कीच आहे. युवक ही आजची इलेक्ट्रॉनिक माध्यमांची प्रमुख गरज आहे. प्रसार माध्यमे समाजाचा आरसा आहे. तरुणाचा कल इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडे अधिक असल्याचे आढळून आहे. इंटरनेच्या माध्यमातून एक अभासी जग प्रत्येक जण तयार करत असतो.

No comments:
Post a Comment