Thursday, October 17, 2019

मी

मला नेहमीच इतरांपेक्षा वेगळे राहायला आवडते. मला माझ्याच दुनियेत राहायला आवडते .माझी दुनिया काही वेगळीच आहे. कॉलेजमध्ये जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा मी माझ्यातच गुंतलेली असते मी स्वप्न बघत बसलेली असते माझ्या आयुष्यातील अशा काही गोष्टी आहेत त्या मला सारखे सतवत असतात. मला कोणतीही वस्तू असो किंवा व्यक्ती आवडली की खूप जवळचे वाटतात. माझ्या  आयुष्यात अशी एक व्यक्ती  आहे तिला खूप खास आहे माझ्यासाठी .मला त्या व्यक्तीशी खूप बोलावस वाटत पण मी नाही बोलू शकत. मी एखाद्या व्यक्तीशी फोनवर बोलते  तेवढे मी समोरासमोर बोलू शकत नाही. माहित नाही का अस? मलाच बहुतेक वेळा प्रश्न पडतो.मला वेगळ्या दुनियेत जगायच आहे. मला  ह्या जगापासून दूर जायचे आहे जिथे मी एकटी असेन.
मी पटकन कुणाशीही मैत्री करून घेते पण कधी कधी एखाद्या व्यक्तीशी पटकन मैत्री नाही करत. मला कुणीही काहीही बोलले तरी पटकन राग येतो. मी कुणाशीही मैत्री केली तरी मी प्रत्येक व्यक्तीची  माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते . मी प्रत्येक व्यक्तीशी समोरा-समोर नाही बोलू शकत. मला नेहमीच नकारात्मक विचार येत असतात. मी कधीच सकारात्मक विचार करूच शकत नाही.

No comments:

Post a Comment