मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते प्रेम तर एकदा तरी रडवते. आणि मैत्री ही दुःखात हसवते मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून बनवू शकतो.मैत्रीत स्त्री-पुरुष भेदही नसतो. एक मैत्री अशी हवी जर न बघता पुढे गेली तर मागून आवाज देणारी आपल्यासाठी हसणारी, वेळ आली तर अश्रू पुसणारी.... स्वतः च्या घासातला घास आठवणीने काढून ठेवणारी मैत्री अशी हवी. मैत्रीच्या नात्याला एकरूप करणारी भविष्यात कितीही नाती जोडली गेली तरी मैत्री या नात्याला अंतर न देणारी.मैत्रीत सगळया गोष्टी शेयर करु शकतो.जीवाला जीव देणारी मैत्री असते. कधीही न संपणारे नाते आहे. आयुष्यात कितीही संकटे आली तरी मैत्रीने साथ सोडता कामा नय. पण आता मैत्रीच राहिली नाही आजची मैत्री संकटात असताना मदत करण्याऐवजी पळून जातात. आजची पिढी मैत्री फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतात.
No comments:
Post a Comment