अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. अंधश्रद्धेमुळे निरपराध प्राण्यांचे बळी जात आहेत. काही ढोंगी लोकांमुळे अशिक्षतामुळे व जुन्या परंपरा विचारसरणीमुळे अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत आहे. अंधश्रद्धेच्या नावावर अनेक ढोंगी स्त्रीयांवर अत्याचार करत आहेत. अंधश्रद्धेला माणूसच जबाबदार आहे. माणूस हा समाजात नको-नकी त्या गोष्टी पसरवत आहे. अंधश्रद्धेमुळे प्राणी जीवनावर विपरित परिणाम होतो.
अंधश्रद्धेच्या नावावर जादू टोना वैगेरे करून ढोंगी बाबा लोकांना लुबाडत आहेत.गावा-गावात जाऊन अंधश्रद्धेविषयी माहिती सांगितली पाहिजे. अशिक्षित लोकांनी अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे. अशिक्षित लोकांचे विचार बदलले पाहिजेत.लोकांचे विचार पिढीनुसार बदलत गेले पाहिजेत.लोकांनी प्रगतीच्या मार्गावर पाऊले उचलली पाहिजे.
Saturday, September 7, 2019
अंधश्रद्धा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment