Tuesday, September 10, 2019

दुष्काळ

दुष्काळ म्हणजे पावसाची कमतरता.दुष्काळ आज आमच्यासमोर भीषण समस्या आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके पुढारलेले आहे की कमीत-कमी पाऊस असणार्‍या प्रदेशातही पुरेशा पाण्याची तजवीज केली जाऊ शकते. भारतात नद्यांचे इतके विशाल जाळे पसरलेले आहे की देशातील कोरड्याहून कोरडे क्षेत्राला सुद्धा दुष्काळमुक्त करता येऊ शकते. दुष्काळ येण्यास वातावरणातील आकस्मिक बदल,वृक्षतोड, ज्वालामुखीचे उद्रेक, वणवे इत्यादी पर्यावरणातील जलचक्रातील कारणे असू शकतात. दुष्काळात अन्नपाण्याच्या अभावी माणसासह बहुसंख्य सजीवाना प्राणसंकटास तोंड द्यावे लागते. आपल्याकडे टंचाई अनेक प्रकारे जाणवू शकते.पाऊस न पडल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्‍यांचे शेतात नुकसान होत आहे पिके वाया जात आहेत. रोजगार मिळत नाही. आज ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबाच्या कुटुंबे गावच्या गाव स्थलांतरित होत आहेत. दुष्काळाने जीवन उद्ध्वस्त झाल्यामुळे त्याच्यांजवळ एकच उपाय उरला आणि तो म्हणजे गळफास लावून आत्महत्या करणे. त्यांची मेहनत वाया जात आहे खूप गंभीर समस्या आहे.
  पावसामुळे धरणे जरी भरली तरी आवश्यक तेवढे पाणी मिळतच नाही. पाणी टंचाईसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. भविष्यात भीषण अन्न टंचाईलाही सर्वानाच सामोरे जावे लागणार आहे. येणारा काळ भयावह असेल. दुष्काळी जनतेची होणारी ससेहोलपट टळावी, पशु-पक्ष्यांचे हाल होऊ नये तसेच अन्नधान्याचा तुटवडा भासू नये यासाठी दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा लागेल. पाणी हा विषय विज्ञान, तंत्रज्ञान, नियोजन आणि कृती यांच्याशी संबंधित आहे. शासनाने विविध पर्यायाचा अभ्यासपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. आज जलयुक्त शिवार, जलसंधारण, जलपुनर्भरण,रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारखे नवे प्रकल्प राबवले जात आहेत. वृक्षसंर्वधनाने मानवाला पाणी लाभू शकते.यासाठी सर्वानी वृक्षतोड थांबवून अधिकाधिक झाडे लावण्यासाठी प्रयत्न करयला हवे. विकसित आणि अविकसित खैडयांमध्ये जलनियंत्रणाच्या दृष्टीने उपाययोजना राबवायला हव्यात.लहान लहान बंधारे  बांधणे, नदी नाले यातील गाळ काढणे यांकडे लक्ष द्यायला हवे!

No comments:

Post a Comment