Sunday, September 8, 2019

विज्ञान

आपल्या सर्व  गरजा पुरवणारी विविध रहस्य उलगडणारी चमत्कारी मानली जाणारी शक्ती म्हणजे विज्ञान. आपल्या भोवतालचा अज्ञानाचा अंधार विज्ञानाने जादूच्या कांडीप्रमाणे दूर केला. विज्ञानाने मानवी जीवनाला अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले.चाकाच्या   शोधानंतर मानवी जीवनाला गती मिळाली. अनेक ठिकाणी कामे सुलभ झाले. वेळ लांबवणारी कामे क्षणार्धात होऊन वेळेची बचत होऊ लागली. मनुष्याला नवी माहिती मिळते. नव्या तंत्राचा विकास होतो. नवे प्रश्न,  नव्या शंका निर्माण होतात आणि विज्ञानचे चक्र सातत्याने सुरू राहते. मानवाने भूमीप्रमाणे सागरावर आणि आंतरिक्षावरही स्वामित्व मिळवले आहे. विज्ञान फक्त आपल्या गरजा पूर्ण करु शकते.विज्ञानाने शोधलेल्या यंत्रानी कष्टाचे महत्व नाहीसे झाले. स्वयंपाकापासून खेळापर्यत उदयोगापासून प्रगतीपर्यत सर्व गोष्टी जलद व सुलभरितीने करण्याचे तंत्र विज्ञानाने दिले. मनुष्याचे आयुष्य सुखकर बनवण्यासाठी नव-नव्या वस्तू बाजारात येतात त्याला तंत्रज्ञान जबाबदार असते. वेगवान संगणक, आयफोन, विमान कर,कॅसरशी सामना करणारे औषधे/उपचार हे सर्व तंत्रज्ञान विकासाची फळे आहेत. विज्ञान म्हणजे केवळ ज्ञान नव्हे तर जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. विज्ञानामुळेच मनुष्य चंद्रावर पोहोचला आहे. आरोग्य, शिक्षण, औद्योगिकीकरण सर्व क्षेत्रात क्रांती घडून आली आहे. विज्ञानामुळे दळणवळण, तंत्रज्ञानासारख्या   क्षेत्रात प्रगती झाली आहे. जगभराची माहिती विज्ञानमुळे घरोघरी एक मिनिटात  पोहोचते.विज्ञान मानवी जीवनाला मिळालेले वरदान आहे. विज्ञानाने बरेच काही साध्य केले आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये अजून आणि अधिक मिळविण्याचे आश्वासन दिले आहे. अवकाश संशोधनात आणि तंत्रज्ञानात भारत आता आघाडीचा  देश आहे. लाॅच, टेक्नॉलॉजी ते उपग्रहची रचना तयार  करणे, त्याचा वापर  सर्व क्षेत्रात भारताने प्राविण्य मिळविले आहे. संपर्क ,प्रसारण, हवामान, आपत्कालीन व्यवस्थापन, टेलिमेडिसीन इत्यादी क्षेत्रात भारताने उपग्रहाचा नेमका वापर केला आहे.

No comments:

Post a Comment