Sunday, September 8, 2019

श्रावण

श्रावण महिन्याची सर्व स्त्रिया व मुली आतुरतेने वाट पाहत असतात. कारण याच महिन्यात आपल्या भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे बरेच सण असतात. त्यामुळे स्त्रियांना नटायला  मिळते हौसमोज करायला मिळते. श्रावणातील ऊन पावसाचा खेळ पाहून मन हरवून जाते.श्रावणात वेली, वनस्पतींना नवीन पालवी फुटलेली असते.  अशा वातावरणात प्रसन्न वाटते.श्रावणसरीच्या स्पर्शाने आपल्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिके आनंदाने डोलताना दिसतात. शेतकरी बांधवांच्या चेहर्‍यावर वेगळाच उत्साह पाहायला मिळतो.श्रावण महिन्यात निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करतात.श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवगार वातावरण असते. सगळ्या ठिकाणी हिरव-हिरव रान फळा-फुलांनी बहरलेला असतो. जणू काही निसर्गाने हिरवी शाल पांघरली आहे. निसर्गाच दृश्य स्मरणात राहण्यासारखे आहे. श्रावणात हिरवे वातावरण पाहून शांत, आल्हाददायक वाटते. अस वाटत की निसर्ग पाहातच राहाव नजर हटता हटत नाही.

No comments:

Post a Comment