Tuesday, September 10, 2019

वृक्ष

दवृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणार निसर्गाच देण म्हणजे वृक्ष. वृक्षाचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. निसर्गाने मानवाला दिलेले अमृत वरदान, छाया याच्यांत एक अतूट नाते आहे. विविध वृक्ष जगाच्या पाठीवर अस्तित्वात आहेत. पर्यावरणाचा समतोल राखणारे हे वृक्ष कोणत्याही अपेक्षेचे भान ठेवणारे पण भरभरून  सर्वस्व देणारेच आहेत.वृक्ष त्यांचे अन्न जमिनीतून व श्वसन वातावरणातून घेतात. जमीन व अवकाश यांच्यात उभा असलेला वृक्षदेह मात्र मानव व सर्व सजीवांसाठी उपयोगी पडतो. वृक्ष मानवाला अनेक प्रकारे उपयोगी पडतात.वृक्षापासून पाने, फळे, फुले तर मिळतातच पण जळाऊ सरपण, काठी असंख्य प्रकारे मानवाने वृक्षांचा जीवनात उपयोग केला आहे. निसर्गाच्या सर्व मोसमांशी ऋतूमानांशी हे वृक्ष सतत संघर्ष करत जगत असतात. वृक्ष रासायनिक औषधे, सुगंधी द्रव्ये, तेल, रस, खत इत्यादी देणारे एक समृद्ध भांडारच आहे निसर्गाची आज दुर्दैवाने होणारी वृक्ष-तोड ढासळलेला पर्यावरणाचा तोल याला जबाबदार मानव आहे. आज दिवसेंदिवस लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे लोकांना राहण्यासाठी जागेची कमतरता भासते त्यामुळे घरासाठी लाकूड हवे. वाहतूकीची कोंडी दूर करण्यासाठी आजूबाजूची रस्त्यालगतची वर्षानुवर्षांची झाडे आपण तोडुन टाकतो. पुरातन काळात वसुंधरेवर प्रचंड जंगले होती. घनदाट वृक्षराजीने सर्व जग व्यापले होते कालांतराने भूपृष्ठावर भूकंपसारखे प्रचंड उत्पात होऊन वृक्ष जमिनीत गाडली गेली. वनक्षेत्र खूप कमी झाले आहे ही चिंताजनक बाब आहे. अनेक अरण्ये नष्ट झाली, पर्जन्यमान घटले,जमिनीची धूप थांबली,जमिनीचे वाळवंटात रूपांतर होऊ लागल, दुष्काळ पडू लागला.
मानवाने आपल्या पायावर आपणच कुर्‍हाड मारुन घेतली.2007 साली महाराष्ट्र वृक्ष दिन साजरा करण्यात येऊ लागला. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी झाडे लावली पाहिजेत.वृक्षाचे महत्व खेड्यापाड्यातील लोकांना पटवून दिले पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम राबवली पाहिजे. एक माणसाला एक दिवसाचे जीवन जगण्यासाकरिता 15 किलो आॅक्सिजन लागतो. 15 किलो आॅक्सिजन  तयार करण्यासाठी किमान 7 झाडे लागतात. मानवाच्या पुढील भविष्यासाठी वृक्ष लावणे गरजेचे आहे नाहीतर त्यांना आॅक्सिजन  मिळणार नाही.

No comments:

Post a Comment