पाऊस का आवडतो आपल्याला?रोजच्या धकाधकीच्या जीवनात पावसाचा सुखद शिडकावा हवासा वाटतो. पाऊस आला की हवामानातला गारवा मूड ही बदलू शकतो.एकदा पाऊस आला की गायब व्हायच नावच घेत नाही. "ये रे ये रे पावसा" म्हणत असताना आता पावसा,थांब ना.... असे म्हणायची वेळ आली. गम्मत पहा ना पावसाची येण्याची आणि शाळा कॉलेज सुरू होण्याची वेळ एकच. पावसाचा आनंद बच्चे कंपनीला घेताच येत नाही. दप्तरात रेनकोट किंवा छत्री असूनही ती बाहेर न काढता भिजत येण्याची मज्जा काही वेगळीच असते.
पावसाचा आनंद घ्यायचा तर मुंबई पुण्यासारख्या काॅक्रीटच्या जंगलात घेता येणार नाही. शहरातून बाहेर जायला हवे.बाहेरची हिरवीगार सृष्टी पाहून मन सुखावून जाते. कोणी पावसाच्या निमित्ताने मस्त गरम भजी करुन खाईल व आनंद व्यक्त करील. कोणी काय हा पाऊस असे म्हणत वैतागेलही. पावसाळ्यातील हिरवाई चांगलीच दिसते. शांत असा पडणारा पाऊस अंगाला एक स्पर्श करून जातो जो प्रत्येकाला हवाहवासा वाटतो.
Sunday, September 8, 2019
पाऊस
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment